Advertisement

नागरी समस्या, तक्रारींसाठी महापालिका फोन नंबर देणार

नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका २४ वॉर्डमध्ये २४ फोन नंबर उपलब्ध करून देणार आहे.

नागरी समस्या, तक्रारींसाठी महापालिका फोन नंबर देणार
SHARES

नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका २४ वॉर्डमध्ये २४ फोन नंबर उपलब्ध करून देणार आहे. शिवाय, '1916' या टोल फ्री क्रमांकावरही मुंबईकरांना प्रशासनाशी संपर्क साधता येणार आहे. या ठिकाणी नागरिकांना आपल्या विभागातील समस्या, तक्रारी मांडून गैरसोय दूर करता येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत ७ मार्च रोजी संपत आहे.

सोसायट्या, झोपडपट्ट्या, आस्थापना, खासगी कार्यालयांसाठी हे क्रमांक उपयुक्त ठरणार असल्यानं महापालिकेची हेल्पलाइन मुंबईकरांसाठी हक्काचा नगरसेवकच ठरणार आहे. मुंबईत आपापल्या वॉर्डमध्ये स्थानिक पातळीवरील सुविधांसाठी, तक्रारी करण्यासाठी नगरसेवक हा पहिली पायरी असतो. त्यामुळं पाण्याची समस्या, कचऱ्याची समस्या, लाइट, मलनिस्सारण, रस्ते अशा कोणत्याही समस्येसाठी रहिवासी पहिल्यांदा आपल्या नगरसेवकाकडे जातात. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ साली निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपत आहे.

त्यामुळं ८ मार्चपासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. कोरोनामुळे या वर्षी निवडणुका लांबल्याने आता पूर्ण निवडणूक प्रक्रिया होऊन वैधानिक समित्यांचा कारभार सुरू होईपर्यंत प्रशासकाच्या हाती कारभार राहणार आहे. परिणामी कोणतेही पद नसल्याने आपल्या समस्या कोणाकडे मांडायची अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका नागरिकांच्या सुविधेसाठी २४ वॉर्डसाठी स्वतंत्र २४ फोन नंबर उपलब्ध करून देणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा