Advertisement

मुंबईत एका दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 46 टक्क्यांची वाढ

पालिकेने जबो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत एका दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 46 टक्क्यांची वाढ
(Representational Image)
SHARES

मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 739 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 29 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बुधवारी 295 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली होती. आज 739 नव्या रुग्णांची भर पडल्याने मुंबईची रुग्णसंख्या 46 टक्क्यांनी वाढली वाढली आहे.

पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2970 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईमध्ये आतापर्यंत 10,44,005 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2027 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.033% टक्के इतका आहे.

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2970 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 357 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 452 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 15, रायगड 84, पालघर 41, रत्नागिरी 11, चंद्रपूर 12, नाशिक 17 आणि नागपूरमध्ये 23 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. बंद पडलेले जम्बो कोविड सेंटर सध्यातरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय BMC ने घेतला आहे. यासोबतच बीएमसीने लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मास्कची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नसून, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने शहरात कोरोना चाचणी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसी रुग्णालयांमध्ये तसेच इतर अनेक ठिकाणी कोरोना चाचणी पुन्हा सुरू करणार आहे. बीएमसीने खासगी रुग्णालयांनाही चाचणीसाठी सतर्क केले आहे. यासोबतच लोकांना कोरोनाचा मुकाबला करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह, मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह दर 8.4% झाला आहे. तर मंगळवारी हा दर ६ टक्के होता.



हेही वाचा

कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेचे नवे निर्देश, मास्क घालण्याबाबत...

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा ५००च्या पार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा