Advertisement

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात; प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात; प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
SHARES

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र १२ जानेवारीला असलेल्या १५१ प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २७ जानेवारीला २०३ झाली आहे. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ५०० दिवसांपलीकडे गेला आहे. 

दर दिवशी केवळ ४०० ते ५०० रुग्ण आढळत असून, त्यापैकी बहुतांशी रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. गंभीर रुग्णांचे प्रमाणही कमी झाले असून, मृत्युदरही ४ टक्क्यांवर आला आहे. मात्र, दुसरीकडं मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होते आहे. १२ जानेवारीपर्यंत मुंबईतील ६ विभागांत एकही प्रतिबंधित क्षेत्र नव्हतं. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारे संगणकीय पद्धतीनं प्रतिबंधित क्षेत्रे अद्ययावत केली जात आहेत.

यामुळं एखाद्या रुग्णाचं नाव आणि पत्ता यात समाविष्ट केल्यानंतर संगणकीय पद्धतीनं तो विभाग प्रतिबंधित दाखवण्यात येतो. मात्र, प्रत्यक्षात एकापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असतील तर क्षेत्र प्रतिबंधित केल्याची कारवाई केली जात असल्याचं समजतं.



हेही वाचा -

Budget 2021: जुन्या गाड्या भंगारात निघणार, वाचा, सरकारची नवी पाॅलिसी आहे तरी काय?

मुंबईतील 'या' चौपाटीवर होणार दर्शक गॅलरी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा