Advertisement

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता

१ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता
SHARES

दरवर्षी जून ते जुलै महिन्यात मुंबईसह राज्यभरात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसानं यंदा ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात दमदार बॅटींग केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पडलेल्या पावसामुळं मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पावसाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरू लागली आहेत.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात कोकण मराठवाड्यासह राज्याच्या काही भागातच सक्रीय असलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात मुंबईसह राज्यात सर्वदूर बरसल्याने महाराष्ट्र सुखावला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरून वाहू लागलं आहेत. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा हे मोठं तलाव जवळपास ९० टक्के भरले आहेत.

दरवर्षी दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा तो सर्वाधिक बरसला असून, राज्यात ५ जिल्ह्यांमध्ये तुरळक हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर (६८), मुंबई उपनगर (६०), रायगड (२), रत्नागिरी (२०), सिंधुदुर्ग (४१), धुळे (४१), अहमदनगर (९८), पुणे (१६), सांगली (२०), कोल्हापूर (८), सोलापूर (७१), औरंगाबाद (८७), जळगाव (१०), बीड (७७), उस्मानाबाद (२१), लातूर (२०), जालना (४३), बुलढाणा (५), परभणी (१४), हिंगोली (७), वाशिम (१०), नागपूर (७) या ठिकाणी इतका पाऊस झाला आहे.

१ जूनपासून आतापर्यंत दरवर्षी सरासरी ७१३.७ मिलिमीटर पाऊस होतो. परंतु, यंदा ८२६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसंच, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या ६ जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला.



हेही वाचा -

फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंट

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा