Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास

जलद गती प्रवासाचा मार्ग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.

मुंबई पुणे मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामध्ये कार, बस व अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावर अनेक वाहने आहेत जी वेगमर्यादा पाळत नाहीत. या मार्गावरील काही ठिकाणी 100 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेग मर्यादा आहे. मात्र ही वेग मर्यादा पाळली जात नाही. याउलट, वाहने केवळ 100 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने चालविली जातात. या मार्गावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर  अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह यांनी 19 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

जलद गती प्रवासाचा मार्ग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या वाहतूक वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून होणार आहे.

94 किलोमीटर अंतराच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारत त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये आला आहे. 

वाहनांची अशी वेग मर्यादा 

किलोमीटर क्रमांक 35.500 ते किमी 52.00 हा भाग घाट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर उर्वरित भाग हा समतल भाग म्हणून ओळखला जातो. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी वाहतूक करतात अशा वाहनांसाठी समतल भागामध्ये तासी वेग मर्यादा 100 किमी आणि घाट क्षेत्रामध्ये 60 किमी अशी करण्यात आली आहे. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. त्या वाहनांसाठी समतल भागामध्ये ताशी वेग 80 किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर अशी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे.

मोटर वाणी ज्यांचा उपयोग माल व साहित्य वाहतुकीसाठी केला जातो यांच्यासाठी देखील समतल भागामध्ये वेग-मर्यादा ताशी 80 किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 कि.मी. प्रति तास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 कि.मी. प्रति तास आहे. त्यामुळे या मार्गावर आता वेग मर्यादेचे बंधन पाळावे लागणार आहेत. 



हेही वाचा

लक्ष द्या! ठाण्यातील 'या' भागात 2 दिवस पाणीपुरवठा खंडित

मुंबईत आयएमडीकडून पावसाचा अंदाज

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा