IPL च्या ऑनलाइन तिकीट्स खरेदी करताना सावधान

आयपीएलच्या तिकीट विक्री ही बूकमाय शोसह आणखी तीन अधिकृत संकेत स्थळावरून विक्री होते.

IPL च्या ऑनलाइन तिकीट्स खरेदी करताना सावधान
SHARES

सध्या (IPL News) आयपीएलचा हंगाम सुरू आहे. हे सामने पाहण्यासाठी तिकीट खरेदी केली जाते. मात्र, बनावट पोर्टलद्वारे खोट्या तिकीट विक्रीचे रॅकेट मुंबई गुन्हे शाखेचे गुन्हे इंटेलिजन्स युनिट (सीआययू) आणि दक्षिण सायबर पोलिसांनी उघड केले आहे. या सायबर चोरट्यांनी बुक माय शो सारखी दिसणारी खोटी, वेबसाइट तयार करून आयपीएलच्या खोट्या तिकीट विक्री करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 10 फ्रँचायझी संघांच्या बनावट तिकिटांची विक्री सुरू केली होती. आयपीएलच्या तिकीट विक्री ही बूकमाय शोसह आणखी तीन अधिकृत संकेत स्थळावरून विक्री होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारणी बूक माय शो डॉट कॉमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या प्रकरणी लेखी अर्ज सादर केला होता. त्यानंतर या प्रकरणी 29 मार्च रोजी दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) अनेक कलमांखाली फसवणूक आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसह बनावट कागदपत्रे आरोपींनी आयपीएलच्या सामन्यांची बनावट तिकिटे बनवली आणि तिकिटे खरी असल्याचा दावा करून त्यांची ऑनलाइन विक्री केली.

तपास करतांना पोलिसांना आढळले की, हे बनावट पोर्टल सौदी अरेबियातील एका आरोपीने तयार केले असून याचे मुख्य सर्व्हर हे हाँगकाँगमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी पेमेंट गेटवेचा तपास सुरू केला. हा तपास करतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरत येथील कामरेज शाखेत ‘एके एंटरप्रायझेस’च्या खात्यात पैसे जमा होत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या पथकाने एके एंटरप्रायझेसच्या मालकाची ओळख पटवली. यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सुरतला गेले. त्यांनी एके एंटरप्रायझेसच्या मालकाला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान, या घोटाळ्याची कबुली दिली. त्याने त्याचे बँक खाते एका व्यक्तीला दिले. या साठी आरोपींनी त्याला ५० हजार रुपये दिले होते.

सर्व आरोपी सुरतचे रहिवासी असून त्यांना 31 मार्च रोजी मुंबईत आणण्यात आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



हेही वाचा

1 आणि 7 एप्रिलला होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी वाहतुकीत बदल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा