बनावट कोरोना चाचणी अहवाल देणाऱ्या दोघांना अटक

दोघे १२०० ते १३०० रुपयांना बनावट अहवाल तयार करत होते. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचॆही त्यांनी बनावट अहवाल तयार केले होते.

बनावट कोरोना चाचणी अहवाल देणाऱ्या दोघांना अटक
SHARES

कोरोना चाचणीचा बनावट अहवाल तयार करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचने अटक केली आहे. अफसर मंगवाना (३४), संकपाल धवने (३४) अशी दोघांची नावं आहेत.  

दोघे आरोपी महापालिकेच्या कोरोना केंद्रात वॉर्ड बॉय म्हणून काम करतात. दोघे १२०० ते १३०० रुपयांना बनावट अहवाल तयार करत होते. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचॆही त्यांनी बनावट अहवाल तयार केले होते.

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोरोना केंद्रात काम करणारा अफसर मंगवाना हा पैसे घेऊन बनावट निगेटिव्ह अहवाल तयार करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यांनी १४ मे या दिवशी खबऱ्यांमार्फत कोरोना ने मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींचे आधारकार्ड मंगवानाला देऊन त्यांचे बनावट कोरोना चाचणी अहवाल तयार करण्यास सांगितले. १८ मे ला मंगवानाने या दोन्ही मृतांचे आरटीपीसीआरचे नकारात्मक अहवाल खबऱ्यांना दिले. 

त्यानंतर युनिट पाचने मंगवानाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने महापालिकेच्या फिरत्या कोरोना चाचणी वाहनावर काम करणाऱ्या संकपाल धवने याच्या मदतीने हा प्रकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संकपाल धवने यालाही ताब्यात घेतले. 



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा