Advertisement

Dahihandi 2023 : मुंबईतील 'या' 6 ठिकाणी अनुभवा दहीहंडीचा थरार

मुंबईत ७ सप्टेंबरला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे

Dahihandi 2023 : मुंबईतील 'या' 6 ठिकाणी अनुभवा दहीहंडीचा थरार
प्रतिकात्मक फोटो
SHARES

जन्माष्टमीच्या निमित्ताने देशभरात तसेच मुंबईतही दहीहंडी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध रस्त्यांवरील सर्व गोविंदा एकत्र येऊन दहीहंडी फोडतात. दहीहंडी ही एक परंपरा आहे.

यंदा ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी होणार असून, दहीहंडी उत्सव ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. तुम्ही मुंबईत असाल तर या 6 ठिकाणी भव्य दहीहंडी उत्सव चुकवू नका.

1) श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (G.S.B.) मंडळ, किंग्ज सर्कल : मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात प्रसिद्ध दहीहंडी कार्यक्रमांपैकी एक, येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

2) बाल गोपाल मित्र मंडळ, लालबाग : जन्माष्टमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेले, दरवर्षी होणारा दहीहंडी उत्सव चुकवू नका.

3) जय जवान मित्र मंडळ, लोअर परळ : हे मंडळ मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे आणि त्याच्या दहीहंडी कार्यक्रमात प्रचंड गर्दी असते. अनेक उत्साही इथे सहभागी होतात.

4) श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव मंडळ, घाटकोपर : जन्माष्टमी उत्सवाचे केंद्र, अनोखी थीम आणि कलात्मक हंडी सजावट यामुळे इथल्या दहीहंडिला भेट दिलीच पाहिजे.

५) संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा दहीहंडी उत्सव शहरातील सर्वात भव्य कार्यक्रमांपैकी एक आहे.

6) श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळ, खारघर : मुंबईतील सर्वात आव्हानात्मक दहीहंडी कार्यक्रमांपैकी एक, हे मंडळ अनोखा अनुभव देतो.


हेही वाचा

टाटा पॉवर गणेश मंडळांना निवासी दरात वीजपुरवठा करणार

'मुंबई दर्शन' बस 5 ऑक्टोबरपासून बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा