Advertisement

Dahi handi 2023 : निर्भया गोविंदा पथक ‘माँ काली’च्या वेशात फोडणार दहीहंडी

व्हिडिओमध्ये मुलींवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी देवी कालीची वेशभूषा केलेली दिसत आहे

Dahi handi 2023 : निर्भया गोविंदा पथक ‘माँ काली’च्या वेशात फोडणार दहीहंडी
SHARES

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. कृष्ण जन्माष्टमी उत्सवाच्या आगमनापूर्वीच मुंबईत जय्यत तयारी सुरू झाली आहे. कृष्ण जन्माष्टमी उत्सवापूर्वी, "निर्भया महिला गोविंदा पथक" नावाचा मुलींचा गट शहरात दहीहंडीची तयारी करताना दिसला. व्हिडिओमध्ये मुलींवरील अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी देवी कालीची वेशभूषा केलेली दिसत आहे

यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबरला असून दहीहंडी उत्सव 7 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. जसा मुलांचा या सणाला मोठा सहभाग पाहायला मिळतो तसंच सध्याच्या काळात मुलीही काही कमी नाहीयेत हे दाखवून देतात. त्यांचीही दहीहंडी पथकं पाहायला मिळतात. ‘निर्भया महिला गोविंदा पथकाने देखील एक वेगळ्या प्रकारे दहीहंडी फोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी कृष्ण जन्माष्टमी सणापूर्वी निर्भया महिला गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी जन्माष्टमीला त्या खास वेशभूषेत दहीहंडी फोडणार आहेत.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी महिला गोविंदा पथक काली मातेचं रूप धारण करणार आहेत. त्या दहीहंडी फोडण्याचा सरावही करत आहे. महिला गोविंदा पथकातल्या सुमारे 80 मुली या दहीहंडीत सहभागी होणार आहेत. या सर्व मुलींना मार्शल आर्टचे पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. मुंबईत हजारो गोविंदा पथक आहेत.

पण, या सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे 10 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील महिला यात सहभागी होत आहेत. या महिला गोविंदा पथकाचा मुख्य उद्देश महिलांवर होणारे अत्याचार थांबवणे आहे. त्याचबरोबर काली मातेच्या रूपातील महिलाही गोविंदा, मातेचा तांडव करून, 5 गट तयार करून दहीहंडी फोडण्याचा सराव करत आहेत.



हेही वाचा

Dahihandi 2023 : मुंबईतील 'या' 6 ठिकाणी अनुभवा दहीहंडीचा थरार

पनवेल पालिका गणेश मूर्ती विसर्जनासाठी 20 कृत्रिम तलाव उभारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा