Advertisement

हळद आणि च्यवनप्राश फ्लेवर आईस्क्रिम, नेटिझन्सचे भन्नाट रिप्लाय

हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम चाखलं आहे का? नाही? मग तुमच्यासाठी हे दोन नवीन फ्लेवर्स या कंपनीनं आणले आहेत.

हळद आणि च्यवनप्राश फ्लेवर आईस्क्रिम, नेटिझन्सचे भन्नाट रिप्लाय
SHARES

आइस्क्रिम (Ice Cream) म्हणजे सर्वांच्या जीवाळ्याचा विषय. नावं घेताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आइस्क्रिम आवडतंच. कुणाला चॉकलेट, कुणाला बटरस्कॉच, कुणाला व्हॅनिला प्रत्येकाची पसंत वेगळी. मात्र तुम्ही हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम चाखलं आहे का? नाही? मग तुमच्यासाठी हे दोन नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत.

तुम्हाला विश्वास बसत नसेल… पण हे खरं आहे. कर्नाटकातल्या डेरी डे या कंपनीनं ही किमया करून दाखवली आहे. या कंपनीनं हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम लाँच केलं आहे.


यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर लाँच केला आहे. त्यात आईस्क्रिम बनवताना कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे हे दाखवलं आहे. याशिवाय आईस्क्रिममध्ये काय घटक आहेत हे देखील दाखवलं आहे. 

औषधी गुणधर्म असलेली हळद भारतातील मसाल्याचा एक भाग आहे. तर च्यवनप्रशा हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुर्वेदिक सप्लिमेंट आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांचा वापर करून आइस्क्रिमही तयार करण्यात आलं आहे.

हळदी फ्लेव्हर आइस्क्रिममध्ये हळद, काळी मिरी आणि मध आहे. तर च्यवनप्राश फ्लेव्हर आइस्क्रिममध्ये इतर जिन्नसांसह खजूर टाकण्यात आलेत. डेरीचे सह संस्थापक यांनी सांगितलं, आइस्क्रिम इंडस्ट्रीत पहिल्यांदाच हळदीचा वापर करण्यात आला आहे.

आता लॉकडाऊनमध्ये हे आईस्क्रिम मिळेल की नाही? किंवा बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होईल, हे सांगता येणं कठिण आहे. पण ट्विटरवर अनेकांनी या आईस्क्रिम संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.



हेही वाचा

Parle G नंतर लॉकडाऊनमध्ये मॅगीची रेकॉर्ड ब्रेक विक्री

Parle G पॅकेटवरील ‘तो’ फोटो कोणाचा?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा