Advertisement

मुंबई दर्शन बसेससोबत 'रेस्टॉरंट्स ऑन व्हिल्स' करू शकतो करार

२४ तास चालणारे रेस्टॉरंट खाजगी किंवा सार्वजनिक टुरिस्ट ऑपरेटर्सशी देखील जोडले जाईल.

मुंबई दर्शन बसेससोबत 'रेस्टॉरंट्स ऑन व्हिल्स' करू शकतो करार
SHARES

मध्य रेल्वेच्या पहिल्या रेस्टॉरंट ऑन व्हील्सला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीएसएमटी स्थानकावर रेल्वेच्या डब्याचे नूतनीकरण करून उभारण्यात आलेल्या या रेस्टॉरंटला १५ दिवस उलटले आहेत. काही दिवसांतच या रेस्टॉरंटमध्ये अनेकांनी जेवणाचा आस्वाद घेतला आहे.

आता हे रेस्टॉरंट्स मुंबई दर्शनाशी जोडण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. हे २४ तास चालणारे रेस्टॉरंट खाजगी किंवा सार्वजनिक टुरिस्ट ऑपरेटर्सशी देखील जोडले जाईल.

सीएसएमटीचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या शेवटी सेंट्रल रेल्वेनं इथं हेरिटेज गॅलरीही बांधली आहे. पी डी मेलो रोडच्या प्रवेशद्वारावर काही जुनी इंजिने आणि डबेही ठेवण्यात आले आहेत. आता या रेल्वे ठिकाणांचा मुंबई दर्शनाच्या वेळापत्रकात समावेश व्हावा, अशी रेल्वेची इच्छा आहे. त्यामुळे इथं येणाऱ्यांना रेस्टॉरंट ऑन व्हील्समध्ये जेवणाचा आनंद घेता येईल.

दररोज १००-१२० लोक रेल्वे रेस्टॉरंटला भेट देतात. इथं दररोज सरासरी ३० हजार रुपयांचा व्यवसाय होतो. जर रेल्वेला परवाना शुल्क इत्यादी भरावे लागतील, तर रेस्टॉरंट चालकांना दररोज सुमारे ₹ ५० हजारांचा व्यवसाय आवश्यक आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुंबई दर्शनाशी जोडले गेले तर दररोज सुमारे ५-७ पर्यटक बसेस इथं भेट देतील. असं केल्यानं अधिक लोक रेस्टॉरंटला भेट देतील.



हेही वाचा

महाराष्ट्रातील 'या' १० रेल्वे स्थानकांवर सुरू होणार ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’

मुंबईत 'इथं' मिळतो बाहुबली मोमो, २ किलोच्या मोमजची किंमत...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा