Advertisement

पंचाना मारहाण; मुंबई सिटी एफसी संघावर बंदी, १० लाखांचा दंड

पंचांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सिटी एफसी १८ वर्षांखालील संघाला उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

पंचाना मारहाण; मुंबई सिटी एफसी संघावर बंदी, १० लाखांचा दंड
SHARES

एमडीएफए एलिट विभागाच्या बुधवारी झालेल्या सामन्यात साहाय्यक सामनाधिकारी उमेश पटेल यांना मुंबई सिटी एफसी संघाकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. यावेळी पंचांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी मुंबई सिटी एफसी १८ वर्षांखालील संघाला उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच, या प्रकरणी १० लाख रुपये दंड ठोठावला आहे.


बेशिस्तीची गांभीर्यानं दखल

मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या शिस्तपालन समितीनं रविवारी कुपरेज मैदानावर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला. शिस्तपालन समितीने मुंबई सिटीच्या बेशिस्तीची गांभीर्यानं दखल घेत ही कारवाई केली. गोलरक्षक प्रशिक्षक अब्दुल कादीर, फिजिओ जय सिंग यांच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली असून, २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


१ वर्षांसाठी बंदी

प्रशिक्षक मोहन दास आणि साहाय्यक प्रशिक्षक सुप्रित जठाना यांना १ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसंच, २५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. या प्रकरणी १० खेळाडूंना १ वर्षांची बंदी आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

शिवस्मारकात भ्रष्टाचार नाही, चौकशीला सामोरे जाण्यास तयार- चंद्रकांत पाटील

PMC खातेदारांची मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा