Advertisement

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नवी मुंबईतील ४ रुग्णालये

म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचाराचा आर्थिक भार पडू नये म्हणून राज्य सरकारने म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत.

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नवी मुंबईतील ४ रुग्णालये
SHARES

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराची लागण होत आहे. या आजारावरील उपचारामध्ये येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचाराचा आर्थिक भार पडू नये म्हणून राज्य सरकारने म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालय सेक्टर १० वाशी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सेक्टर ५ नेरुळ, इंद्रावती हॉस्पिटल सेक्टर ३ ऐरोली, तेरणा हॉस्पिटल सेक्टर २२ नेरुळ या रुग्णालयांचा समावेश आहे.

 या उपचारांमध्ये ॲण्टीफंगल औषधे हा महत्वाचा भाग असून ही औषधे महाग आहेत. त्यामुळे ही औषधे शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहित कार्यपध्दती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व रुग्णालयातील पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत असा आदेश सरकारने दिला आहे. 

नवी मुंबई महापालिकेने म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली आहे. म्युकरमायकोसिस रूग्णशोधासह मोफत तपासणी, चाचण्या व उपचाराची  सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

महापालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. याठिकाणी गरज भासल्यास डायग्नोस्टिक टेस्ट्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच पालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात म्युकरमायकोसिस वरील रूग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांनी म्युकरमायकोसिस संबंधित लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडीमध्ये विनामूल्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 



हेही वाचा - 

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

  1. आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा