Advertisement

ठाणे स्थानकात ६० हजार प्रवाशांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या

ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणे स्थानकात आतापर्यंत ६० हजार प्रवाशांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापासून परप्रांतांतून येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानक परिसरात शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या जात आहेत.

ठाणे स्थानकात ६० हजार प्रवाशांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या
SHARES

ठाणे महापालिका प्रशासनाने ठाणे स्थानकात आतापर्यंत ६० हजार प्रवाशांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यापासून परप्रांतांतून येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे स्थानक परिसरात शीघ्र प्रतिजन चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमधून ९४१ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. 

जुलै महिन्यात लाॅकडाऊन शिथील करण्यात आला. त्यानंतर परप्रांतीयांची पुन्हा मुंबई-ठाण्यात येण्यास सुरुवात झाली होती. परप्रांतीयांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानक परिसरात शीघ्र प्रतिजन चाचणी करण्यास सुरुवात केली. या चाचण्यांसाठी  ३५ जणांचं पथक कार्यरत करण्यात आलं. रोज ८०० ते ९०० प्रवाशांची प्रतिजन चाचणी करण्याचे लक्ष्य ठेवलं होतं. त्यानुसार मागील तीन महिन्यांमध्ये ६० हजार ३५३ नागरिकांच्या शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत ६३८ पथकांच्या माध्यमातून १९ लाख ९२ हजार ६५३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये करोना, सारी आणि इन्फ्ल्युएन्झा यांसारख्या आजारांची लक्षणे असलेले ५ हजार ६९० संशयित आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates लस चाचणीसाठी स्वयंसेवकांची गरज

Matheran Mini Train अखेर माथेरानची मिनी ट्रेन रुळावर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा