Advertisement

मेट्रो ४ मार्गिकेचे आतापर्यंत ४९ टक्के काम पूर्ण

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली असा मेट्रो 4 चा मार्ग आहे.

मेट्रो ४ मार्गिकेचे आतापर्यंत ४९ टक्के काम पूर्ण
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेचे आतापर्यंत ४९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर न्यायालयाने दोन खटल्यांचा निकाल एमएमआरडीएच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे संथगतीने सुरू असलेल्या ‘मेट्रो ४’च्या कामाला आता गती येईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे.

इंडो निप्पॉन केलिकल कंपनीने २०१८ मध्ये, तर यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्थेने २०१९ मध्ये या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

‘मेट्रो ४’ मार्गिकेमुळे आपल्या मालमत्तेचे नुकसान होत असून या मार्गिकेचा संरेखनात भूसंपादन आणि अन्य बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गिकेचे काम बंद करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

त्याचबरोबर ३०१ कोटी इतकी भरपाई देण्याचीही मागणीही याचिकाकर्त्यानी केली होती. मात्र नुकत्याच या याचिका फेटाळून न्यायालयाने एमएमआरडीएच्या बाजूने निर्णय दिला आहे. 

जुहू विमानतळाजवळील ‘अंधेरी पश्चिम – मानखुर्द मेट्रो २ ब’च्या बांधकामासाठी एमएमआरडीएला देण्यात आलेल्या ‘ना हरकती’ला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या उंचीच्या निर्बंधांच्या विरोधात एमएमआरडीएला ‘ना हरकत’ जारी करण्यात आली आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा