Advertisement

‘शेर शिवराज’वरून मनसे आक्रमक, प्राइम टाइम न दिल्यास खळ्ळ खट्याकचा इशारा

मनसेकडून चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात आलं आहे.

‘शेर शिवराज’वरून मनसे आक्रमक, प्राइम टाइम न दिल्यास खळ्ळ खट्याकचा इशारा
SHARES

‘शेर शिवराज’ या चित्रपटाला मुंबईतच प्राईम टाईम शो मिळत नसल्याची तक्रार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केली आहे. याची गंभीर दखल घेत मनसेकडून चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात आलं आहे.

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ‘शेर शिवराज’ चांगली गर्दी खेचत असूनही चित्रपटाला मुंबईत प्राईम टाईम शोज मिळत नाहीत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर मनसेतर्फे चित्रपटगृह मालकांना निवेदन देण्यात येत आहे. समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं आहे. तसंच, या चित्रपटाच्या व्यवसायामध्येही वाढ होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचा शो हाऊस फुल आहे. पहिल्याच दिवशी एक १.०५ कोटींचा गल्ला कमावल्यानंतर या चित्रपटाचे शोही वाढवण्यात येत आहेत, असं तरण आदर्श यांनी सांगितलं आहे. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शेर शिवराज'ला मुंबईत प्राईम टाईम शोच मिळत नसल्याचं म्हटलं आहे.



हेही वाचा

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षय कुमारनं तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीतून घेतली माघार; म्हणाला...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा