Advertisement

संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका आणि मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत.

संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
SHARES

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे (४७) यांचं गुरूवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका आणि मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

भिडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. 

नरेंद्र भिडे यांनी सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, अनुमती, दिल ए नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, चाँद फिर निकला (हिंदी) अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. 

तसंच कोण म्हणतं टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्ड्स, व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलिबाबा आणि 40 चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण या नाटकांनादेखील संगीत दिलं आहे.

मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते.त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा