Advertisement

१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला? जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले

तुम्ही कोणाचे नोकर आहात? १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न अख्तर यांनी पठाण यांना विचारला आहे.

१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला? जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले
SHARES

आम्ही १५ कोटी मुस्लिम, १०० कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य करणारे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे नेते वारिस पठाण (Aimim waris pathan) यांना बाॅलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (lyricist javed akhtar) यांनी चांगलंच झापलं आहे. तुम्ही कोणाचे नोकर आहात? १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न अख्तर यांनी पठाण यांना विचारला आहे. कोल्हापूर इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा- वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

भायखळ्यातील एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा.

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

पठाण यांच्या वक्तव्यावर जावेद अख्तर चांगलेच भडकले असून त्यांनी तितक्याच कडक शब्दांत वारिस पठाण यांची खरडपट्टी काढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशातील मुस्लीम लीगची मानसिकता गेलेली दिसत नाही. याचं उदाहरण म्हणजे वारिस पठाण.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: शरद पवारांचीच चौकशी करा

तुम्ही कोणाचे नोकर आहात. तुम्हाला १५ कोटी मुस्लिमांचा (muslims) ठेका कोणी दिला? असा प्रश्न विचारत वारिस पठाण सारख्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला अख्तर यांनी दिला. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा