Advertisement

महाविकास आघाडीची गुरुवारी मुंबईत महत्त्वाची बैठक

जागावाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे.

महाविकास आघाडीची गुरुवारी मुंबईत महत्त्वाची बैठक
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीही आपापल्या पक्षांशी जागावाटपावर चर्चा करत आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा गुरुवारी सुटण्याची शक्यता आहे.  

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट जागावाटपावर चर्चा करणार आहेत. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीसाठी डाव्या पक्षांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. या बैठकीत काही जागांवर एकमत न झाल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन जागावाटपाचा अंतिम निर्णय होईल. आतापर्यंत 30 जागा वाटप झाल्याची माहिती मिळत आहे. जो पक्ष जागा जिंकेल, असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उर्वरित 18 जागांवर चर्चा अपेक्षित आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातील दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देण्यात येणार आहेत. पवार गटाच्या कोट्यातून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

16 एप्रिल 2024 ला लोकसभा निवडणुका होणार का?

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून मीरा भाईंदर बंद करण्याची धमकी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा