Advertisement

राष्ट्रवादीमुळे शिंदे गटात नाराजी, दोन आमदारांमध्ये तु तु-मैं मैं

वृत्तानुसार, आमदारांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा नागपूर दौरा रद्द करावा लागला.

राष्ट्रवादीमुळे शिंदे गटात नाराजी, दोन आमदारांमध्ये तु तु-मैं मैं
SHARES

अजित पवारांची (Ajit Pawar) सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने शिंदे गटात (Shinde Group) मोठी नाराजी असल्याचे समोर येत आहे. दरम्यान मंत्रीपदावरून शिंदे गटात यावरून दोन गट निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी याच मुद्यावरून शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली असल्याचे वृत्त 'लोकसत्ता'ने दिले आहे.

विशेष म्हणजे, दोन आमदारांमध्ये बाचाबाची सुरु असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) नागपूरचा दौरा सोडून मुंबईत परतल्याचे देखील दावा करण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. यावेळी झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेकांना संधी मिळाली. पण अनेक इच्छुकांना दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र ऐनवेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिंदे गटातील इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. त्यामुळे शिंदे गटात आता दोन गट निर्माण झाले आहेत. तर मंत्री असलेल्या लोकांचे मंत्रीपद काढून आता ते आम्हाला देण्यात यावे अशी मागणी इच्छुक आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



हेही वाचा

एकनाथ शिंदेंचे पद धोक्यात? अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा