Advertisement

शनिवारच्या चावडीत महेश मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा

महेश मांजरेकर यांनी मीराची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.

शनिवारच्या चावडीत महेश मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा
SHARES

‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन चांगलाच रंगात आला आहे. त्यात शनिवारी पहिली चावडी रंगणार आहे. यासंदर्भातील एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यात महेश मांजरेकर यांनी मीराची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.

पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमध्ये टक्कर पाहायला मिळाली. बिग बॉसनं दिलेल्या एका टास्कमध्ये दादूस आणि अक्षय वाघमारे हे समोरासमोर होते. दोघांमध्ये झालेल्या टास्कमध्ये विजयी ठरवण्यासाठी घरच्या महिला सदस्यांना एकमत घ्यायचं होतं. पण महिला सदस्तेयांना एकमतानं निर्णय घेता आला नाही. अखेर टास्क रद्द करण्यात आला.

पण बिग बॉसनी तो टास्क स्वत:हून थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दादूस थांबले. पण दादूस विजयी झाले असूनही त्यांना विजयी ठरवलं नाही, असं अनेकांचं मत होतं. दादूसना विजयी न ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयात मीराचं देखील नाव होतं. त्यामुळे महेश मांजरेकर मीरावर चिडले.

पण नेहमीप्रमाणे समोरच्याचं पूर्ण न ऐकता मीरा स्पष्टीकरण द्यायला गेली. त्यावर महेश मांजरेकर म्हणाले की, "आधी समोरच्याचं ऐकायला शिक". त्यामुळे पहिली चावडी चांगलीच रंगणार हे प्रोमवरून तरी पाहायला मिळत आहे.     

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोकं एकत्र रहाणार म्हणजे वादविवाद होणारच, खटके उडणारच. तसंच काहीसं यावेळेस देखील दिसून येतं आहे. मीरा पहिल्या दिवसापासूनच काहीना काही मुद्द्यांना घेऊन चर्चेत आहे. मग कधी ते स्नेहा वाघ सोबत असो तर कधी जयसोबत असो.

आज मीरा आणि आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पडली. मीराला आविष्कार सांगायचा प्रयत्न करत होता की, “बाकीच्या सदस्यांनी जसं आवरून ठेवलं आहे तसं तरी किमान ठेवावं.” तसं करण्यास मीरानं साफ नकार दिला आणि हे आतापासून नाही पहिल्या दिवसापासून तसंचं आहे असं ती म्हणाली. त्यावरून वाद पुढे वाढला.

आविष्कार म्हणाला, “पहिल्या दिवसाचं मला सांगू नकोस, प्रत्येक जण स्वत:चं काम करतो आहे बाकी साफ सफाई करणं माझं काम आहे. तुला मुद्दाम टाकायचं असेल तर मी बघतो काय करायचं...

मीरा त्यावर म्हणाली की, “मी तुम्हांला एकच काम सांगत आहे, तुम्हाला करायचे असेल तर करा, नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. मी आता करणारच आहे तक्रार.

मीरा पुढे म्हणाली, “पहिल्या दिवसापासून हे मला त्रास देत आहेत. रोज सकाळी हेच. त्यांनी कालपासून ठरवलं आहे की ते मला नडणार आहेत. जरा मी नडायला गेले ना यांना तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन - दोन काम करत आहेत. दुसर्‍या दिवशी सांगितलं होतं पहिले बेडरूम करायची आणि मग किचन. मग का नाही ऐकत , मी नाही ना अडून बसले त्यावर”.



हेही वाचा

महिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला, तृप्ती देसाईंवर सोनालीचा निशाणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा