Advertisement

अनंत चतुर्दशीला अप फास्ट लोकल चर्नी रोड स्थानकावर थांबणार

अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्नी रोड स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशीला अप फास्ट लोकल चर्नी रोड स्थानकावर थांबणार
SHARES

अनंत चतुर्दशीच्या दिवशी चर्नी रोड स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान अप जलद मार्गावरील सर्व स्थानकात लोकल गाडय़ांना थांबा देण्यात येणार आहे. सध्या सायंकाळी गर्दीच्या वेळी या स्थानकादरम्यान जलद मार्गावर लोकल गाड्यांना थांबा नाही.

9 सप्टेंबर सायंकाळी 5 ते रात्री 8.30 या कालावधीत लोकल गाडय़ांना थांबा असेल, अशी माहिती देण्यात आली. त्यादिवशी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सर्व अप धिम्या मार्गावरील गाडय़ा चर्चगेटकडे जाताना चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर मात्र थांबणार नाहीत. या कालावधीत चर्नी रोड स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवरून एकही गाडी उपलब्ध होणार नाही. 

ही व्यवस्था फक्त 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 8.30 या दरम्यानच्या गर्दीच्या वेळेत लागू असेल. हा निर्णय “प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी” घेण्यात आला आहे, असे अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.

WR अधिकाऱ्यांनी सांगितले की, गणपती उत्सवाच्या शेवटच्या दिवशी चर्नी रोड स्थानकावर प्रचंड गर्दी होते जेव्हा दक्षिण आणि मध्य मुंबई उपनगरातून अनेक मूर्ती गिरगाव समुद्रासमोर विसर्जनासाठी नेल्या जातात. 

दरवर्षी, चर्नी रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे काळजी घेते.

दरम्यान, चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष फेऱ्याही चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

अप दिशेने

  • विरारहून पहिली विशेष उपनगरीय फेरी मध्यरात्री सव्वा बारा वाजता चर्चगेटसाठी सुटेल.
  • विरारहून दुसरी विशेष उपनगरी लोकल मध्यरात्री पावणे एक वाजता चर्चगेटसाठी सुटणार आहे.
  • विरारहून तिसरी विशेष सेवा मध्यरात्री ०१.४० वाजता
  • विरारहून चौथी विशेष लोकल पहाटे ०३.०० वाजता सुटणार आहे.

डाऊन दिशेने

  • डाऊन दिशेने पहिली विशेष सेवा चर्चगेटहून मध्यरात्री ०१.१५ वाजता विरारसाठी
  • दुसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री ०१.५५ वाजता
  • तिसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री ०२.२५ वाजता
  • चौथी विशेष लोकल चर्चगेटहून ०३.२० वाजता विरारसाठी सुटेल.



हेही वाचा

आता तुम्हालाही करता येणार AC Local मधून प्रवास, वाचा सविस्तर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा