Advertisement

मुंबई-दिल्ली राजधानी विशेष ट्रेन 'या' तारखेपासून धावणार

मार्चमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई-दिल्ली राजधानी ट्रेन स्थगित करण्यात आली होती.

मुंबई-दिल्ली राजधानी विशेष ट्रेन 'या' तारखेपासून धावणार
SHARES

बुधवारी, २३ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेनं (CR) दिलेल्या माहितीनुसार, राजधानी विशेष ट्रेन आठवड्यातून चार दिवस मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान धावतील. मार्चमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई-दिल्ली राजधानी ट्रेन स्थगित करण्यात आली होती.

प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०१२२२ राजधानी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी डिसेंबरपासून रात्री १०.१० वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता ही ट्रेन हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

याशिवाय रेल्वे क्रमांक ०१२२२ ही राजधानी हजरत निजामुद्दीन इथून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दुपारी ४.५५ वाजता सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ११.५० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

मध्य रेल्वेनं पुढे सांगितलं की, ०१२२१ राजधानी विशेष ट्रेनचं बुकिंग २५ डिसेंबर रोजी सुरू होईल. कनफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्यास परवानगी देण्यात येईल.

आरक्षण: केटरिंग शुल्क वगळता राजधानी विशेष ट्रेनचं बुकिंग २५ डिसेंबरला सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर उघडेल.

विशेष रेल्वेगाडीच्या ठिकाणांच्या विस्तृत वेळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कनफर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.



हेही वाचा

१ जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag बंधनकारक, नितीन गडकरी यांची घोषणा

बेस्ट बसमधून ६० रुपयात करा २४ तास प्रवास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा