Advertisement

सीएसएमटी ते कर्जत गाठता येणार २० मिनिटांत, रेल्वे कॉरिडॉरचे काम जोमात

हा दुहेरी मार्ग मुंबई ते कर्जत मार्गे पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल.

सीएसएमटी ते कर्जत गाठता येणार २० मिनिटांत, रेल्वे कॉरिडॉरचे काम जोमात
SHARES

कर्जत आणि पनवेलला जोडणाऱ्या 30 किमी लांबीच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) ने गुरुवारी 2.6 किमी लांबीच्या बोगद्यासाठी डोंगरात ब्लास्ट कण्यात आला. हा सर्वात लांब बोगदा असेल. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत प्रवासाचा वेळ २० मिनिटांपेक्षा कमी होईल.

या दुहेरी मार्गावर एकूण तीन बोगदे आणि दोन रेल्वे ओव्हरब्रिज असतील जे मुंबई महानगर प्रदेशातील दोन सर्वात दूरच्या टोकांना - रायगड आणि नवी मुंबई यांना जोडतात. एकूण 3.12 किमी लांबीच्या बोगद्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एका बोगद्यासाठी खोदकामही सुरू झाले आहे.

MRVC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता म्हणाले की, हा दुहेरी मार्ग मुंबई ते कर्जत मार्गे पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल.

“कल्याण मार्गे सध्याच्या मार्गापेक्षा कमी अंतरामुळे CSMT ते कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळही कमी होईल. हा अतिरिक्त उपनगरीय कॉरिडॉर वेगाने विकसित होत असलेल्या पनवेल, कर्जत आणि NAINA (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) च्या पुढील आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल,” गुप्ता म्हणाले.

पनवेल आणि कर्जत स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या उभारणीवरून एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रोड ओव्हर/ अंडर ब्रिज आणि कर्जत आणि पनवेल येथे प्रत्येकी एक रेल्वे उड्डाणपूल बांधतील.

प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

सध्या हा ऐकेरी मार्ग आहे ज्याचा वापर काही लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्यांद्वारे केला जातो. या प्रकल्पांतर्गत विभागाचे उपनगरीय कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्यासाठी पॅरेरल लाइन तयार केली जात आहे.

"या दुहेरी मार्गाच्या कॉरिडॉरमुळे मुंबई ते कर्जतला पनवेलमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणारी उपनगरीय सेवा चालवणे शक्य होईल. कल्याणमार्गे सध्याच्या मार्गापेक्षा कमी अंतरामुळे सीएसएमटी आणि कर्जत दरम्यानचा प्रवास कमी होईल.



हेही वाचा

मुलुंड फूट ओव्हर ब्रिज आजपासून खुला, दुरुस्तीसाठी होता बंद

मढ ते वर्सोवा प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या कसा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा