बीजेपी पर शिवसेना का ‘प्रहार’

  • मिलिंद सागरे & मुंबई लाइव टीम
  • राजनीति

मुंबई - भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी आता शिवसेनेनं प्रहार संघटनेची युती केलीय. विदर्भात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना-प्रहार संघटनेची युती झालीय. अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेतली. नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आलाय. शेतमालाचे भाव पडलेत. सरकार मात्र सगळं काही अालेबल आहे असं दाखवत आहे.या मुद्यांवर बच्चू कडू यांची प्रहार संघटना सरकारविरोधात आंदोलन करणाराय. या आंदोलनात शिवसेनेनंही सहभागी व्हावं, अशी विनंती बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना केलीय. विदर्भात शिवसेनेला भाजपविरुद्ध आक्रमक नेतृत्वाची गरज आहे तर बच्चू कडू यांनादेखील शिवसेनेसारख्या पक्षाची गरज आहे. त्यामुळे नोटाबंदीवरून बच्चू कडू आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही भविष्यात विदर्भातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जातेय.

अगली खबर
अन्य न्यूज़