मार्केटच्या राजाचा सामाजिक उपक्रम

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वरळी - वरळीत 2007 साली स्थापन केलेल्या विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 10 वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने सोसायटीत रहाणा-या किंवा साई मेडिकल सेंटर यांच्याशी सलग्न असलेल्या कॅन्सर पिडितांना मदत केली जाते. सोहम आर्टस यांच्याकडून दरवर्षी 8 फुटांची गणेश मूर्ती बनवून घेण्यात येते. यावर्षी या मंडळात अष्टविनायक देखावा साकारला आहे. तसंच मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम, बॉडी चेकअप, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.  वरळी बीडीडीत असणारे हे सर्वात मोठे गणेश मंडळ आहे. त्यामुळे या गणेशाला मार्केटचा राजा म्हणूनही संबोधले जाते.

पुढील बातमी
इतर बातम्या