आक्सा समुद्रकिनारी विदयार्थ्यांची स्वच्छता मोहिम

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मालाड - आक्सा समुद्रकिनाऱ्यावर मालाड सुंदरनगर येथील डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी स्वच्छता मोहिम राबवली. विदयार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावर पडलेला प्लास्टिक, कचरा गोळा केला. शाळेच्या कॉज नेचर क्लबच्या 44 विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सकाळी 8 ते 9.15 यावेळेत विदयार्थ्यांनी समुद्रकिनारपट्टीची स्वच्छता केली. यावेळी त्यांच्यासोबत शाळेतील शिक्षिका स्टुडी डिसोजा आणि एच. निशा या ही सहभागी झाल्या होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या