देखाव्यातून 'पाणी वाचवा'चा संदेश

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वरळी- वरळीतल्या फटाकडा चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 32 वे वर्ष आहे. या मंडळाकडून या वर्षी पाणी वाचवा असा संदेश देण्यात आला आहे. तसंच पाणी नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल यावर भाष्य करणारं बॅनरही लावण्यात आलेत. गतवर्षी देखाव्यामध्ये महल साकारण्यात आला होता. तसेच नाम फाउंडेशनला पाच हजार रुपयांची मदत देखील करण्यात आली होती. उत्सवादरम्यान शिबीरांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे शालेय मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मंडळाला कोणत्याही राजकिय नेत्यांचा आधार नाही. परंतु गणेशोत्सवात स्थानिक आपल्या परिस्थितीप्रमाणे थोडीफार मदत करतात. त्यातून छोटे छोटे उपक्रम आम्ही राबवतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संकेत पाटिल यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या