पालिकेला पडलाय स्वच्छतेचा विसर

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्य़ाने प्रयत्न होत असतात. त्यासाठी पालिकेकडून जनजागृतीची मोहिमही राबवण्यात येते. पालिकेचे' स्वच्छता मार्शल' कचरा फेकणाऱ्या नागरिकांकडून दंडही घेतात. पण याच पालिका प्रशासनाला परिसर स्वच्छतेचा मात्र पुरता विसर पडला आहे.

 सांताक्रूझ पुर्व शिवाजीनगर येथील वाकोला नाला परिसरात ठेवण्यात आलेल्या कचरापेट्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होत आहे. त्यामुळे जनजागृती करण्यासोबतच पालिकेने कचरापेट्यांमध्ये पाणी साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशी  मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या