जावेद अन्सारीची तडीपारीची शिक्षा कायम

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वडाळा - तडीपारीच्या शिक्षेविरोधात अपील करणाऱ्या अट्टल गुन्हेगार जावेद अन्सारीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. येथील कोकरी आगार परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या जावेद आलम अन्सारी याची तडीपारीची शिक्षा कामय करण्यात आली होती. 9 जानेवारी 2016 ला मुंबई पोलीस कायदा कलम 56 अन्वये त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. यावर त्याने विभागीय आयुक्त कोकण विभाग मुंबई यांच्याकडे हद्दपारीच्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

न्यायालयात सुनावणी सुरु असतानाही त्याने चोरी केली. त्यामुळे मंगळवारी विभागीय आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळले आणि त्याची शिक्षा कायम ठेवली. सदर याचिकेमध्ये सरकारतर्फे अॅड. पै, वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या