महाराष्ट्र मंडळामध्ये 'आरसे महाला'चा देखावा

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर गणेशोत्सव मंडळ यावर्षी 69वा गणेशोत्सव साजरा करत आहे. या मंडळानं यावर्षी आरसे महालाचा देखावा साकारलाय.

पश्चिम उपनगरातील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक मंडळ असा या मंडळाचा लौकीक आहे. येथील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 69 वर्षात मंडळाच्या गणेशमूर्तीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र येथील देखावा दरवर्षी वैशिष्टपूर्ण असाच असतो. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरसे महालाची प्रतिकृती साकारली आहे. तसंच सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून मंडळ दरवर्षी शाळांना शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबवत असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत थारोवे यांनी सांगितले.  

पुढील बातमी
इतर बातम्या