सावरकरांच्या आत्मार्पण दिनी वसंत लिंगनूरकर यांचं व्याख्यान

दादर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचं औचित्य साधून रविवारी वसंत लिंगनूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारत हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य पूर्व काळातील समतावादी दृष्टीकोन या विषयावर ज्येष्ठ पत्रकार वसंत लिंगनूरकर यांनी व्याख्यान दिले. हा कार्यक्रम दादर पश्चिम येथील पाटील मारुती सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी, अखिल भारत हिंदू महासभेचे सदस्य तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या