विलास शिॆंदेंना हीच आदरांजली...

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

चर्चगेट - वाहतूक कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना सिडनहॅम कॉलेज आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली. हुतात्मा चौकात विद्यार्थ्यांनी कॅंडल लावून विलास शिंदे यांना आदरांजली वाहिली. तसंच चर्चगेट ते हुतात्मा चौक अशी रॅलीही काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापराविषयी जनजागृती केली. हेल्मेट घालूनच बाईक चालवणे हीच खरी विलास शिंदेंना आदरांजली असल्याचं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं. यावेळी सिडनहॅम महाविद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब खिन्नर, प्राध्यापिका शबाना खान, एनएसएसचे मुख्य प्रवर्तक चौगुले उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या