चेंबूर-सांताक्रुझ रोडवर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

  • समीर कर्नूक & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी चेंबूर सातांक्रुझ लिंक रोड खुला करण्यात आला. मात्र सध्या या रोडची मोठी दयनीय अवस्था झाली असून येथे खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे सध्या वाहनचालकांना या मार्गावरदेखील वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. ठाणे, नवीमुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना तात्काळ पश्चिम उपनगरात आणि विमानतळ परिसरात जाता येण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला. केवळ दोनच वर्षात उड्डाणपुलाची ही अवस्था झाल्याने कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या