नॅशनल पार्कमध्ये पोलिसांवर दगडफेक

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

बोरिवली - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पोलिसांवर सुरू असलेलं हल्लासत्र आद्यापही सुरू असून, शिवीगाळ, धक्काबुक्कीनंतर आता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान हा प्रकार घडला. त्यात एका महिला पोलिसासह एक भक्तदेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. 

 पोलिसांनी विसर्जन करण्यासाठी घाई केल्यानं हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. रविवारी संध्याकाळी बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गणेश विर्सजन तलावात गणपती विसर्जन सुरू होतं, रात्री दहाच्या सुमारास गणेश विर्सजन करण्यासाठी पोलीस घाई करत असल्याच्या रागातून तीन तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीत महिला पोलीस शिपाई दहीबावकर यांच्यासह चंद्रकांत सुतार हे गणेशभक्त जखमी झाले. सध्या दहीबावकर आणि सुतार यांच्यावर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कस्तुरबा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एका २६ वर्षीय संदेश सुतार नावाच्या तरूणाला अटक केली आहे.  तर अन्य दोन तरुण फरार आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या