छायाचित्रकारांवरील हल्ल्याचा चित्रांतून निषेध

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

लालबाग - वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांवर गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा गुरुकुलच्या बालचित्रकारांनी चित्रांतून निषेध केलाय. पत्रकारांवर हल्ले होऊ नये यासाठी पत्रकार संरक्षण कायदा संमत करा अशी मागणी बालचित्रकारांनी चित्रांतून केली आहे.

बॉम्बे हाउसबाहेर गुरुवारी तीन नामांकित वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. बॉम्बे हाउसमध्ये टाटा समूहाचं मुख्यालय आहे, येथे ही घटना घडली. मिड डेचे ज्येष्ठ छायाचित्रकार अतुल कांबळे, टाइम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाइम्सचे हरजित सिंह यांना मारहाण झाली होती. या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या