अजय देवगण हा बॉलिवूडमध्ये सिंघम म्हणून ओळखला जातो. पण त्याची ही सिंघमगिरी फक्त चित्रपटांपुरतीच मर्यादित आहे. घरी मात्र या सिंघमचं काही एक चालत नाही आणि खास करून काजोलसमोर तर नाहीच नाही. याचा प्रत्यय नुकताच आला. झालं असं की, अजय देवगणनं काजोलसोबत एक प्रँक केला. पण हा एक प्रॅक त्याला भारी पडला आहे. कारण त्याच्या या प्रँकवर काजोल प्रचंड संतापली आहे.
अजय देवगणनं सोमवारी काजोलचा मोबाइल नंबर ट्विटरवर शेअर केला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. काजोल देशाबाहेर आहे. तिच्या या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून तिच्याशी समन्वय साधा, असं पोस्ट करत अजयनं काजोलचा नंबर ट्विटरवर शेअर केला. अजयनं शेअर केलेला काजोलचा नंबर ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअॅप या अॅपवर तपासल्यास तो नंबर खरा असल्याचं आढळलं. नंबर केल्याच्या काही तासांनी हा एक प्रँक असल्याचं अजयनं ट्विट केलं. पण अजयच्या या ट्विटचा काजोलला मात्र मनस्ताप झाला आणि ती अजयवर प्रचंड चिडली.
<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
काजोलनं देखील अजयच्या या प्रँकला चांगलंच उत्तर दिलं आहे. तुझे प्रँक्स आता स्टुडिओच्या बाहेरसुद्धा होऊ लागले आहेत असं दिसतंय. पण त्यांना माझ्या घरात अजिबात प्रवेश नसेल, असं उत्तर काजोलनं दिलं आहे. काजोलच्या या ट्विटवर अनेकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अजय देवगण दिसण्यावरून तुम्हाला जरी गंभीर स्वभावाचा वाटत असला तरी तो तसा नाही. चित्रपटाच्या सेटवरदेखील त्यानं अनेकांसोबत प्रँक केले आहेत. त्यामुळे त्याचा मस्तीखोर स्वभाव तसा सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी मात्र अजयनं काजोलशी पंगा घेतला आहे.
हेही वाचा -