ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शबाना आझमी यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या असता शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावर पुढील उपचार घेण्यासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शबाना यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी व खोकल्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्या रुटीन चेकअपसाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या असता, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. 

दरम्यान ‘आता माझी प्रकृती सुधारत आहे’. ‘मला आराम करण्यासाठी फार कमी वेळ मिळत असल्याने मी आता आराम करणार आहे. तसेच याकडे फक्त आजारपण या दृष्टीकोनातून न पाहता स्वत:ला मिळालेला ब्रेक म्हणून पाहणार आहे.


हेही वाचा -

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेची चतुर्थशतक पूर्ती!

यासाठी सई जाणार अज्ञातवासात!


पुढील बातमी
इतर बातम्या