तुम्ही आराध्या-अब्राहमचा डान्स बघितला का? नसेल तर इथे बघा!

स्टार किड्समध्ये आराध्या कायमच चर्चेत असते. मग ते विमानतळ असो की एखाद्या पार्टीतले फोटो! आराध्या कायमच सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या आराध्याचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. या डान्सवरून आराध्याची प्रशंसा केली जात आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात अनेक स्टार किड्सने सहभाग घेतला होता. यावेळी आराध्याने केलेल्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली. व्यासपीठावर गाणं सुरू होताच, आराध्या आत्मविश्वासाने नाचू लागली. अगदी गाण्याच्या सुरूवातीपासून ते गाणे संपेपर्यंत उपस्थितांच्या नजरा आराध्यावर खिळल्या होत्या. यावेळी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, जया बच्चनही आराध्याचे कौतुक करायला उपस्थित होत्या.

या व्यतिरीक्त शाहरूख खान, ह्रतिक रोशन, लारा दत्ता, सोनू निगम, रविना टंडन असे अनेक सेलेब्रिटी स्टार मुलांना प्रोत्साहन द्यायला उपस्थित होते.

यावेळी शाहरूखने देखील आपल्या लाडक्या अब्राहमचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अब्राहमच्या शालेय कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणही आठवणींमध्ये रममाण झाल्याचे किंग खानने म्हटले आहे. अब्राहमने आपल्या वडिलांच्याच 'ये तारा वो तारा' या 'स्वदेस' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला.. आणि आपल्या मुलाचा हा डान्स बघण्यात शाहरूखही हरवून गेला.

पुढील बातमी
इतर बातम्या