केवळ रील लाईफ जोड्यांनीच नव्हे, तर हिंदी सिनेसृष्टीतील रीअल लाईफमधील जोड्यांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही जोडी यापैकीच एक आहे. आठ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना एकाच चित्रपटात दिसणार आहे.
गुलाब जाम
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी आजवर जवळजवळ आठ चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला आहे. यापैकी काहींमध्ये दोघे जोडीच्या रूपात, तर काही चित्रपटांमध्ये एकत्र असूनही परस्पर भिन्न कलाकारांसोबत दिसले. आता पुन्हा एकदा दोघेही जोडीच्या रूपात एकत्र दिसणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. ‘गुलाब जाम’ या आगामी हिंदी चित्रपटात ऐश्वर्या-अभिषेक ही रीअल लाईफ जोडी पुन्हा एकत्र झळकणार आहे.
२००० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक राज कंवर यांच्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात ऐश्वर्या-अभिषेक प्रथमच एकत्र आले होते. २००३ मध्ये रोहन सिप्पींच्या ‘कुछ ना कहो’ मध्ये ही जोडी पुन्हा एकत्र आली. याशिवाय ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरू’, ‘सरकार राज’ या चित्रपटांसोबतच २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक मणी रत्नम यांच्या ‘रावण’ या चित्रपटामध्येही दोघे एकत्र होते. त्यानंतर आता म्हणजेच जवळजवळ आठ वर्षांनी पुन्हा एकदा ऐश्वर्या-अभिषेक सिल्व्हर स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हेही वाचा -
'बघा' यामी गौतमचा 'बोल्ड अँड ब्युटीफूल' लूक!
डेंग्यूने अडवली श्रद्धाची वाट!