अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड २' चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार

अक्षय कुमार (Akshay Kumar) सप्टेंबरपासून मध्य प्रदेशात त्याच्या आगामी 'ओह माय गॉड 2' (Oh My God 2) या चित्रपटाची शूटिंग सुरु करणार आहे. एमपी टुरिज्मच्या अधिका-यांनी सांगितल्यानुसार, उज्जैन इथं त्रिपटाचं चित्रीकरण (Shooting) सुरू होऊ शकते.

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचा चित्रपट 'ओह माय गॉड 2'मध्ये आता यामी गौतमचीही (Yami Gautam) एंट्री झाली आहे. चित्रपटाशी संबंधित अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, मागील भागाची कथा या चित्रपटात नाही. यावेळी निर्माते एक वेगळी कथा सांगतील.

यावेळी अक्षय कुमारसुद्धा विष्णूच्या अवतारात दिसणार नाही. तो यावेळी दुस-या देवाच्या अवतारात दिसेल. शेवटचा भाग परेश रावल यांच्या दृष्टिकोनातून होता. यावेळी पंकज त्रिपाठी यांच्या दृष्टिकोनातून असेल.

चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होईल. कारण अक्षयकडे पुढील दोन महिन्यांसाठी तारखा नाहीत. अक्षय या दोन महिन्यात दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करेल. सध्या त्याची प्राथमिकता 'राम सेतू' आहे.

२० जूनच्या सुमारास तो त्याचे चित्रीकरण सुरू करेल. त्याचा सेट फिल्मसिटीमध्ये आहे. त्याच्या शेजारीच 'रक्षाबंधन' चित्रपटाचा सेट आहे. दोन्ही चित्रपट दोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, यामीची या चित्रपटातील भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण यात कोणताही रोमँटिक अँगल नाही. यामीच्या अगोदर या भूमिकेसाठी मृणाल ठाकूरच्या नावाची चर्चा होती. पण यामीच्या लग्नानंतर लगेच तिचं नाव समोर आलं आहे. अद्याप निर्मात्यांकडून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


हेही वाचा

हृतिक रोशनचा पुन्हा एकदा CINTAAला मदतीचा हात

हिरोपंती टाळा! टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी विरोधात गुन्हा दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या