दिग्दर्शक अनुराग बासूच्या लुडो चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेचं कारण की, चित्रपटातील एकाचा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे. आता तुम्हीच हा फोटो पाहा आणि या फोटोतील व्यक्ती कोण आहे ते सांगा. बघा तुम्ही ओळखू शकताय का ते?
ओळखलंत का? पाहताच क्षणी कोण आहे हे सांगणं जरा कठिण आहे. पण जरा निरखून पाहा. ही काय आलिया भट नाही. तर हा आहे राजकुमार राव. राजकुमार राव लुडो या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील त्याचाच हा लुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एका फोटोत मुलगीची वेशभूषा साकारणारा राजकुमार दुसऱ्या फोटोत मिथुन चक्रवर्तीसारखी हेअर स्टाईल ठेवलेली दिसत आहे.
राजकुमारच्या या फोटोंवर चाहत्यांकडून एकाहून एक कमेन्ट येत आहेत. काहींनी तर त्याची आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनशी तुलना केली आहे. राजकुमार रावसोबत या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, अभिषेक बच्चन, फातीमा सना शेख, सान्या मल्होत्रा, पंकज त्रिपाठी आणि रोहित सरफ यांच्याही भूमिका असणार आहेत. हा चित्रपट २४ एप्रिल २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा