धक्कादायक! बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्र्यातल्या आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन (Bollywood actor Sushant Singh Rajput commits suicide in Mumbai) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती रविवार १४ जून २०२० रोजी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या घरातील नोकराला त्याचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर या नोकराने स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशीला सुरूवात केली आहे.

मागील ६ महिन्यांपासून सुशांत मानसिक आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळत आहे. शिवाय रात्री उशीरापर्यंत तो मित्रांसोबत आपल्या घरात होता. परंतु सकाळी त्याने दरवाजा न उघडल्याने नोकराने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीआन हिने काही दिवसांपूर्वीच मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावर उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशा बॉलिवूड जगातील एक प्रतिभावान पब्लिक रिलेशन मॅनेजर होती. सुशांत सिंग राजपूतशिवाय तिनं रिहा चक्रवर्तीसह अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं. त्यापाठोपाठ सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे बाॅलिवूड हादरून घेतलं आहे.

'काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे यांसारखे हिट बॉलिवूड सिनेमे सुशांत सिंह राजपूत याने दिले होते.  सुशांत याचे केवळ भारतातीलच नाही, तर जगभरात चाहते आहेत. पवित्र रिश्ता या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेतून सुशांतचं नाव घराघरांत पोहोचलं होतं. त्यानंतर त्याने सिनेमांमध्ये एण्ट्री घेतली होती. 

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या एक्स मॅनेजरची आत्महत्या

पुढील बातमी
इतर बातम्या