केदारनाथ चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या केदारनाथ या चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली आहे. अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. प्रभाकर त्रिपाठी यांच्या वतीनं बुधवारी ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डानं केदारनाथ चित्रपटाचं पुन्हा परिक्षण करावं, तोपर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

कारण काय?

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच स्थान असलेल्या चारधामांपैकी एक असलेल्या 'केदारनाथ' या नावाने लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा बनतो कसा बनवला जातो? असा प्रश्न विचारत केदारनाथ सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे.

राजकीय हेतून प्रेरित

ही याचिका राजकीय हतेूनं प्रेरित असू शकते, असा दावा सीबीएफसीतर्फे करण्यात आला आहे. केदारनाथ चित्रपटाचं परिक्षण करण्यात आलं असून चित्रपटात काहीह आक्षेपार्ह नाही, असा दावा सीबीएफसीनं न्यायालयात केला आहे. येत्या शुक्रवारी या चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असल्यामुळे गुरुवारी या प्रकरणावर उच्च न्यायालयानं सुनावणी ठेवली आहे.


हेही वाचा-

नवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड

तंत्रज्ञान व मानवतेचा संगम घडवणारा रिलोडेड कल्पनाविष्कार!


पुढील बातमी
इतर बातम्या