रजनिकांत यांचा 'दरबार', २५ वर्षानंतंर साकारणार पोलिसांची भूमिका

आगामी ‘दरबार’ या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रजनीकांत यांचा खास अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो

चित्रपटामध्ये बॉलीवूडचा अण्णा अर्थात अभिनेता सुनील शेट्टी देखील भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगादोस यांनी केलं आहे. हा चित्रपट ९ जानेवारीला पोंगलच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणार आहे. यामध्ये अभिनेत्री नयनाताराचीही मुख्य भूमिका आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

रजनीकांत या चित्रपटात २५ वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी १९९२ मध्ये ‘पांडियन’ या तामिळ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक भूमिका केल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्दीत रजनीकांत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील.


हेही वाचा

बॉलिवूडचा 'हा' गाजलेला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

पुढील बातमी
इतर बातम्या