अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाचा गैरवापर, फेक आधारकार्डच्या सहाय्याने हॉटेलमध्ये रुम बुक

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • बॉलिवूड

बनावट आधारकार्डच्या सहाय्याने मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याने तिने याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.

संपूर्ण प्रकार

सकाळी साडे दहाच्या सुमारास उर्वशी एका इव्हेंटसाठी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहचली. याठिकाणी पोहचताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या नावावर एक रूम बुक असल्याचं सांगितलं. हे एकून उर्वशीला धक्का बसला, कारण तीने वा तिच्या टीमने अशी कुठलीही रूम बुक केली नव्हती. त्यानंतर रूम बुकिंगचे डिटेल्स चेक केले तेव्हा, उर्वशीच्या नावाचा गैरवापर करत बनावट आधार कार्ड वापरण्यात आल्याचं समोर आलं. यानंतर लगेचच उर्वशीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी कलम ४२० अंतर्गत आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे बुकिंग कुठून करण्यात आलं? यासाठी आयपी अॅड्रेसचा रेकॉर्ड तपासला जाणार आहे.

उर्वशी रौतेला ही बी-टाऊनमधील एक अभिनेत्री आहे. सनी देओलच्या सिंग साहब दी ग्रेट या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर भाग जॉनी, सनम रे या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली होती. यानंतर ग्रेट ग्रॅँड मस्ती मध्ये उर्वशी हॉट अवतारात प्रेक्षकांसमोर आली. अलीकडेच उर्वशीचा हेटस्टोरी ४ हा चित्रपट रिलीज झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या