हृतिक रोशन 'या' चित्रपटात साकारणार ४ वेगवेगळ्या भूमिका

‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात वेधाच्या रूपात दिसणारा हृतिक रोशन चार वेगळ्या भूमिकेत देखील पाहायला मिळणार आहे. त्याची पात्रं काशीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. 

यासाठी हृतिकनं आपला गेटअप आणि कॉस्ट्यूमविषयी काही खास माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर हृतिक आपल्या पात्रासाठी खास काशीची भाषा देखील शिकणार आहे. भाषा आणि टोन शिकवण्यासाठी एक प्रशिक्षकही नेमण्यात आला आहे.

चित्रपटात हृतिकच्या लूकवर बरेच प्रयोग केले जात आहेत. त्याचे वेधाचे पात्र तरुण वयापासून ते गुन्हेगारी जगतात अधिपत्य गाजवण्यापर्यंतचे वेगवेगळ्या रूपात दाखवले जाणार आहे. हृतिक स्वत:ही चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण 'धूम 2’ नंतर तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम वेधाचे ४० टक्के चित्रीकरण मुंबईत होणार आहे. तर उर्वरित ६० टक्के चित्रीकरण हे लखनऊ, बनारस आणि यूपीत होईल.

कोविडची दुसरी लाट आली नसती तर एप्रिल महिन्यातच हा चित्रपट फ्लोअरवर आला असता. निर्माते याचे चित्रीकरण काही लाइव्ह लोकेशनवर घेऊ इच्छित आहेत. यासाठी त्यांनी मुंबई आणि काशीमध्ये काही ठिकाणाची पाहणी केली आहे.

टीम आधी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाचे शेड्यूल पूर्ण करेल. दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी आपल्या टीमकडून हृतिक रोशनच्या पोशाखाची ट्रायलदेखील घेतली आहे. चित्रपटात हृतिकला फिट दाखवले जावे का फॅट यावर निर्माते अजून विचार करत आहेत.

चित्रपटात सैफ अली खान पोलिस विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याची भूमिका सकारात्मक आहे. सैफ म्हणाला, 'आपण तात्पुरता विचार करूया, खरचं माणसाची १० डोकी असतील तर त्याचा मेंदू खरोखरच किती वेगवान असेल. पडद्यावर त्या गोष्टी साकारणे हा स्वत:चा एक उत्तम अनुभव असेल."

पुढील बातमी
इतर बातम्या