दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर लय भारीचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांचं निधन झालं आहे. ते ५० वर्षांचे होते. यकृताच्या गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी याचं खंडन केलं. अनेक कलाकारांनी ट्विट करत निशीकांत जिवंत असून  प्रकृती चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं. पण संध्याकाळी हैदराबादच्या रुग्णालयाकडून त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली. 

मराठी ब्लॉकबस्टर, लय भारी या चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारा अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विटरवर लिहलं की, "मला माझ्या मित्राची आठवण येईल. निशीकांत कामात रेस्ट इन पीस"

रितेश सिधवानी यांनी लिहिलं की, "निशीकांत कामतच्या  कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:खदायक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."

निशीकांत कामत यांना डोंबीवली फास्ट, लय भारी आणि सातच्या आत घरात या मराठी चित्रपटांसह दृश्यम, फोर्स, फोर्स, रॉकी हँडसम आणि मदारी या चित्रपटांचं दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं.

डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरलला होता. यानंतर मुंबई साखळी बॉम्बस्फोटावर आधारित ‘मुंबई मेरी जान’ या हिंदी चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. यानंतर त्यांना दृश्यम, मदारी, फुगे अशा चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या.

जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांना व्हिलेनची भूमिका साकारली होती. त्यांनी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत भावेश जोशी या चित्रपटात देखील काम केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निशीकांत सध्या आपला आगामी चित्रपट दरबारसाठी काम करत होते. त्यांचा हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होऊ शकतो.


पुढील बातमी
इतर बातम्या