शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका, खटले सिमल्याला हलवा - कंगना रणौत

शिवसेनेचा माझ्यावर राग असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी चालू असलेले आपल्याविरुद्धचे सर्व कोर्ट खटले सिमला येथील न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी विनंती कंगनाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे

कंगनाविरुद्ध मुंबईच्या न्यायालयांत अनेक खटले सुरू आहेत. वकील अली कासिफ खान यांनी कंगनाविरोधात एक खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांच्या मानहानीचा आहे. तिसऱ्या खटल्यामध्ये कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि रंगोलीविरोधात खटला दाखल केला आहे.

जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्या प्रकरणात हजर न राहिल्याने न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले असून, पुढील सुनावणीला हजर राहण्यास सांगितलं आहे.  

मुंबईत खटल्याची सुनावणी झाली तर माझ्यावरील राग काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात, असं कंगणाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. न्याययंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये देशातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयारी आहे. मात्र मुंबईत जाण्यास आपणास भीती वाटते, असं कंगनानं म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या