प्रियंका चोप्राची आई संतापली, घटस्फोटाच्या वृत्तावर म्हणाली...

(File Image)
(File Image)

प्रियंका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून तिच्या पतीचं आडनाव काढून टाकल्यानंतर चर्चा चांगल्यास रंगल्या आहेत. सोमवारी, २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या.

लग्नाच्या तीन वर्षांनंतरच घटस्फोट घेत असल्याची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये देखील रंगली. ही बातमी पसरताच प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी मौन तोडले आणि सर्व अफवा फेटाळून लावल्या.

“हे सर्व बकवास आहे, अफवा पसरवू नका,” मधु चोप्रा यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं.

तिच्या टीमने या प्रकरणावर प्रतिक्रिया किंवा टिप्पणी दिली नाही, परंतु अभिनेत्रीनं तिचं नाव का बदललं याविषयी नेटिझन्समध्ये अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत.

दरम्यान, प्रियंकाच्या मुंबईतील जवळच्या मित्रानं नाव न सांगण्याच्या अटीवर ETimes ला सांगितलं की, या निराधार अफवांवर विश्वास ठेवू नका. मित्रानं सांगितलं की, सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये अतिविचार करण्याची प्रवृत्ती विकसित झाली आहे.

रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की, अभिनेत्री अलीकडेच निकसोबत त्यांच्या नवीन घरात गेली. या जोडप्यानं त्यांची पहिली दिवाळीही त्यांच्या नवीन घरात साजरी केली. 'क्वांटिको' स्टारनंही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या घटस्फोटाच्या अफवा सर्व मजेदार आहेत. प्रियंका तिचे पहिले नाव वापरत आहे कारण तिला तिच्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये ते वापरायचे आहे. इतर कोणत्याही अनुमानात तथ्य नाही. तसंच, तिनं केवळ 'जोनास'च नाही तर 'चोप्रा' देखील सोशल मीडियावर टाकलं आहे, असं इंडिया टुडेला एका मित्रानं सांगितलं. हसत हसत या मैत्रिणीनं सांगितलं की, प्रियंका नेहमी इंटरनेट ब्रेकर आहे. बरं, खरंच तिनं ते पुन्हा केलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीनं गेल्या आठवड्यात तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून तिच्या नावामधून 'जोनास' काढून टाकले होते. ज्यामुळे या जोडप्यामधील गोष्टी ठीक नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या.


हेही वाचा

अभिजीत बिचुकले गाजवणार हिंदी 'बिग बॉस', एन्ट्रीलाच घेतला पंगा

पृथ्वीराज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

पुढील बातमी
इतर बातम्या